बीड : बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या कारभाराने बीड जिल्ह्याला सतत मान खाली घालावी लागत आहे, अशी टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे.
जिल्ह्यात जेव्हा आमची सत्ता होती तेव्हा जिल्ह्यामध्ये एक आदर्श आणि कामाची उंची वाढली होती. आता सध्या या पालकमंत्र्यांच्या सत्तेत अनेक अधिकारी ‘अँटी करप्शन’च्या जाळ्यात अडकत आहेत. त्यामुळे बीड जिल्ह्याला मान खाली घालावी लागत आहे, असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुडेंवर निशाणा साधला.
दरम्यान, पालकमंत्र्यांचा अधिकाऱ्यांवर कोणताच दबाव नाही. त्यामुळे अधिकारी आपल्या मर्जीने काम करत आहेत. आमची सत्ता असताना सर्वसामान्यांच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आम्ही अधिकाऱ्यांना धाकात ठेवायचो पण आता तसं होताना दिसत नाही, असंही पंकचा मुंडे यावेळी म्हणाल्या.
महत्वाच्या घडामोडी –
कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी…; अमृता फडणवीसांचं नवीन गाणं रिलीज
…नाहीतर एकाही मंत्र्याला राज्यात फिरू देणार नाही- गोपीचंद पडळकर
…हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, हा उठावडेपणा; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल
“भाजप नेत्या चित्रा वाघ, नगरसेवक धनराज घोगरे यांच्याविरोधात पोलिसांत तक्रार”