बीड : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे काल परळीत एकाच व्यासपीठावर एकत्र दिसले. यामुळे अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
परळी शहरात स्वर्गीय मनोहरपंत बडवे सभागृह लोकार्पण सोहळा तसेच विठ्ठल रुक्मिणी मूर्ती प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेवर धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, आणि प्रीतम मुंडे या तिघांचीही नावं होती. मात्र पंकजा मुंडे परळीत नसल्याने त्या या कार्यक्रमाला उपस्थिच राहू शकल्या नाहीत.
दरम्यान, प्रीतम मुंडे आणि धनंजय मुंडे हे शेजारी बसले होते. मात्र शेजारी बसले असले तरी, या दोघांमध्ये कोणताही संवाद झाला नाही. मात्र या प्रसंगाने राज्यातली चर्चांना उधाण आलं.
महत्वाच्या घडामोडी –
नारायण राणे-शिवसेना प्रकरणावर राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार; काँग्रेसच्या ‘या’ मोठ्या नेत्याचं वक्तव्य
“नागपूरमध्ये शिवसेनेला धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश”