धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत; रेणू शर्मांनंतर आता करुणा शर्मांची मुंबई पोलीस आयुक्तांकडे तक्रार

0
405

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. रेणू शर्मा यांच्यानंतर आता धनंजय मुंडे यांची दुसरी पत्नी करुणा शर्मा यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडेंविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गेल्या तीन महिन्यापासून धनंजय मुंडे यांनी त्यांच्या दोन मुलांना चित्रकूट बंगल्यात डांबून ठेवल्याचा आरोप करुणा शर्मा यांनी केला आहे.

धनंजय मुंडे मला माझ्या मुलांशी भेटू देत नाहीयेत. 24 जानेवारी रोजी मुलांची भेट घेण्यासाठी बँगल्यावर जाताच धनंजय मुंडे यांनी पोलिसांना बोलावून मला हकलून लावलं. बंगल्यावर माझी मुले सरक्षित नाहीत, असं करुणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्या मुलांसोबत काही चुकीचे झाल्यास त्याला धनंजय मुंडे जबाबदार असणार आहेत, असही करुणा शर्मा म्हणाल्या.

महत्वाच्या घडामोडी-

“…तर मग फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?”

शरजीलवर कारवाई करायला उशिर का होतोय?; चंद्रकांत पाटलांचा राज्य सरकारला सवाल

येत्या 15 फेब्रवारीपासून महाविद्यालये सुरू होणार- उदय सामंत

“शिवरायांना अभिवादन करताना योगींना आधी चप्पल काढायला शिकवा”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here