मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीच्या मेट्रोत बसून फोटो काढला होता. तो फोटो ट्विट करत, मुंबई मेट्रोतून कधी प्रवास करता येईल? असा सवाल महाविकास आघाडी सरकारला विचारला होता. त्यावर राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी त्यांना उत्तर दिलं.
काल माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो ट्विट करत मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल अशी विचारणा केली. त्यांना माझे विनम्रपणे हे सांगणे आहे की मुंबई मेट्रोचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत महाविकास आघाडी सरकार गांभीर्याने लक्ष देत कटिबद्ध आहे, असं महेश तापसे म्हणाले.
मुंबई मेट्रो-3 हा प्रकल्प महाविकास आघाडी सरकार पूर्ण करेल यात शंका नाही. परंतु केंद्राकडून वारंवार अडथळा निर्माण केला जात आहे, अशी मुंबईकरांची भावना आहे. त्यामुळे केंद्रासोबत आपण जर संवाद साधलात तर प्रकल्प लवकर पूर्ण होऊ शकेल आणि तुम्हालाही मुंबई मेट्रो-३ मध्ये प्रवास करण्याची व फोटो काढून ट्वीट करण्याची लवकरच संधी मिळेल”, असंही महेश तपासे यांनी म्हटलं आहे.
काल माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते मा. @Dev_Fadnavis यांनी दिल्ली मेट्रोतील फोटो ट्विट करत मुंबई मेट्रोचे काम कधी पूर्ण होईल अशी विचारणा केली. त्यांना माझे विनम्रपणे हे सांगणे आहे की मुंबई मेट्रोचे काम जलद गतीने पूर्ण करण्याबाबत मविआ सरकार गांभीर्याने लक्ष देत कटिबद्ध आहे. pic.twitter.com/VWH7jA7oOj
— Mahesh Tapase महेश तपासे (@maheshtapase) January 28, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“BREAKING NEWS! राज ठाकरे यांना बेलापूर कोर्टाकडून वाॅरंट”
भाजपच्या अधिकृत वेबसाईटवर झालेल्या चुकीच्या उल्लेखावर रक्षा खडसेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
“तुम्हाला खरंच महिला सन्मानाचा इतका कळवळा असता, तर…”
मुंबईवर हक्क सांगण्याचा प्रश्नच नाही; कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांना अजित पवारांचं प्रत्युत्तर