मुंबई : देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकंच आम्ही सुचवू शकतो, असं म्हणत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस यांच्यवर निशाणा साधला आहे.
देवेंद्र फडणवीस हे फार काळ विरोधी पक्षात राहणार नाहीत. त्यांच्यामागची ‘माजी’ बिरूदावली लवकरच जाईल. या वक्तव्यामुळे विरोधकांच्या मनात गुदगुल्या झाल्या असतील पण महाराष्ट्रात असं काही होणार नाही. तेव्हा देवेंद्रजी, विरोधी पक्षनेते म्हणून कामाला लागा इतकंच आम्ही सुचवू शकतो, असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
भाजपने सत्तेचा गैरवापर करून विरोधी पक्ष खरेदी-विक्री संघ उघडला होता. त्या मार्गाने महाविकास आघाडी किंवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज तरी जाताना दिसत नाहीत, जर त्यंनी विरोधी बाकावरील 105 लोकांशी संवाद साधायचं ठरवलं तर विरोधी फक्षाचं काय होईल, असंही अग्रलेखात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
डोनाल्ड ट्रम्प जर मुंबईला आले असते तर त्यांनी आधी शिवथाळी चाखली असती- संजय राऊत
ठाकरे सरकारकडून कौतुक करावं असं काम झालेलं नाही- पंकजा मुंडे
ठाकरे सरकार येत्या 11 दिवसांत कोसळेल; नारायण राणेंच भाकित