मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी शिष्टमंडळासमवेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवी दिल्ली येथील निवासस्थानी भेट घेऊन राज्याचे केंद्राकडे प्रलंबित विषय मार्गी लावण्याची विनंती केली. यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते पत्रकार परषदेत बोलत होते.
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची शिष्टमंडळासोबत भेट घेतली. आम्हाला आनंद आहे की, महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारसोबत किमान एक संवाद सुरू केला आणि निश्चतपणे संवादाचा फायदाच होत असतो. म्हणून या भेटीचं पहिल्यांदा मी स्वागत करतो.”असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
दरम्यान, या भेटीतील जे काही विषय आहेत, जवळपास 11 विषय या भेटीत आम्ही मांडले अशाप्रकारचं सांगण्यात आलं आहे. या 11 पैकी 8 ते 9 विषय असे आहेत, की जे पूर्णपणे राज्य सरकारच्या अख्त्यारितले आहेत. पण तरी देखील ते केंद्राकडे मांडण्यात आले. पण ठीक आहे, अपेक्षा असेल की केंद्राने काही अजून त्यात मदत करावी. केंद्र सरकारच्यावतीने ती निश्चतपणे मिळेल.” असंही देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय.
महत्वाच्या घडामोडी –
“नवनीत राणा तुमच्यामध्ये थोडी जरी नैतिकता शिल्लक असेल तर खासदारकीचा राजीनामा द्या”
“सत्तेत एकत्र नसलो तरी नातं तुटलेलं नाही”; मोदींच्या भेटीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रीया
किती हे असंवेदनशील सरकार; पुण्यातील मुळशी दुर्घटनेवरून भातखळकरांची मुख्यमंत्र्यांवर टीका
“भाजपच्या दादांनी राष्ट्रवादीच्या दादांवर ‘लेटर बॉम्ब’ टाकला, पण तो चंद्रकांतदादांच्या हातातच फुटला”