“देवेंद्र फडणवीसांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे”

0
171

मुंबई : अर्थसंकल्पेवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हा अर्थसंकल्प राज्य सरकारचा की मुंबई महापालिकेचा? हा प्रश्न निर्माण होतो आहे. अर्थसंकल्पातून नमूद करण्यात आलेले अनेक प्रकल्प आमच्या काळात सुरु झालेले आहेत. त्यात काहीही नवीन नाही, असं फडणवीस यांनी म्हटलं. यावर मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी प्रतिक्रिया देत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

सध्या देवेंद्र फडणवीस यांचं मानसिक संतुलन बिघडलं आहे. त्यांना डोळ्यापुढे फक्त मुंबई महापालिका, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातलं महाविकास आघाडीचं सरकार या तीनच गोष्टी दिसत आहेत, असं म्हणत भाई जगताप यांनी फडणवीसांवर आरोप केले आहेत.

दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या काळात मुंबई पालिकेच्या निवडणूका डोळ्यापुढे ठेवून अर्थसंकल्प बनवला असेल. ते त्यांच्या डोक्यात असेल आणि त्यातूनच ते अर्थसंकल्पाला नावे ठेवत आहेत. फडणवीसांना सुचलंही नाही अशा अनेक गोष्टी या सरकारने करुन दाखवल्या आहेत, असा दावाही भाई जगताप यांनी यावेळी केला.

महत्वाच्या घडामोडी –

“अभिनेता रणबीर कपूर कोरोना पाॅझिटिव्ह?”

“तक्रार देण्यासाठी गेलेल्या 26 वर्षीय महिलेवर पोलिस उपनिरीक्षकाने केला बलात्कार”

भाजपला पुन्हा धक्का; ‘या’ दिग्गज नेत्याचा शिवसेनेत प्रवेश

मराठा आरक्षण प्रश्नी मोदी सरकारने समाजाच्या व महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसला- सचिन सावंत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here