पंढरपूर पोटनिवडणूक निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

0
166

मुंबई : पंढरपूर-मंदळवेढा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. पंढरपुरात भाजपचे उमेदवार समाधान आवताडे विजयी झाले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार भगीरथी भालके यांचा 3700 मतांनी पराभव केला. या निकालानंतर भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस  यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी करेक्ट कार्यक्रम करतो, असं बोललो होतो. आजही मी त्या वक्तव्यावर ठाम आहे. योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करायचाच आहे. पण आता कोरोनाशी लढायचं आहे. आता आम्ही आमचे श्रम कोरोनासाठी वळविले आहे”, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भाजपवर जनतेनं विश्वास दाखवला. त्यामुळे मी पंढरपूरच्या जनतेचं मनापासून आभार मानतो. गेल्या दीड वर्षातील महाविकास आघाडीच्या गैरप्रकाराला, भ्रष्टाचारी आणि भोंगळ कारभाराला एकप्रकारे आरसा दाखवण्याचं काम पंढरपुरच्या जनतेना केलाय, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, हे सरकार आल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणुकीत राज्य सरकारचे तीन पक्ष उतरले. साम-दाम-दंड-भेद अशा सगळ्या पद्धती अवलंबले. त्यांनी प्रशासनाचा गैर उपयोग केला. मोठ्या प्रमाणात पैशांचा गैरउपयोग केला. त्यामुळे भाजपच्या उमेदवारांचा विजय झाला”, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

तृणमूल काँग्रेसच्या विजयाचे श्रेय या बंगालच्या वाघिणीला द्यायला हवं- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

“त्या अजित पवारांना शोधा, तुमच्या घरात शिरून बीजेपी ने तुम्हाला ठोकलंय”

गड आला पण सिंह गेला; नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना पराभवाचा धक्का

पंढरपूरमध्ये राष्ट्रवादीला पराभवाचा धक्का; भाजपच्या समाधान अवतावडेंनी मिळवला विजय

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here