राजगृह तोडफोड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी पोलीस आयुक्तांकडे ‘ही’ महत्वाची मागणी

0
154

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. या घटनेचा भाजप नेते व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही निषेध नोंदवला आहे.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निवासस्थान असलेल्या ‘राजगृह’ यावर करण्यात आलेला हल्ला हा अत्यंत निषेधार्य असून आरोपींना तात्काळ अटक व्हावी अशी आमची मागणी आहे. मी स्वतः भीमराव (दादासाहेब) आंबेडकरजी यांच्याशी फोनवर याबाबत चर्चा केली आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, अतिरिक्त पोलीस आयुक्तांशी चर्चा करून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी देखील केली आहे, असं मत देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केलं.

महत्वाच्या घडामोडी-

एक शरद… सगळे गारद!; संजय राऊतांनी प्रसिद्ध केला मुलाखतीचा टिझर

“राजगृहावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध, आरोपींना कठोर शिक्षा व्हावी”

“…तरीही सरकार पाडण्याच्या मोहिमेतून फडणवीस व त्यांचे लोक माघार घ्यायला तयार नाहीत”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे निवासस्थान असलेल्या राजगृहावर अज्ञातांकडून तोडफोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here