मुंबई : आरे येथील मेट्रो कारशेड कांजूरमार्ग येथे हलविण्याचा निर्णय दुर्देवी असून तो केवळ अहंकारातून घेण्यात आला आहे. असा आरोप विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. यावरुन शिवसेनेनं सामना अग्रलेखातून देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिलंय.
मेट्रो कारशेडसाठी फडणवीस सरकारने रात्रीच्या अंधारात दोन हजारांवर झाडे निर्घृणपणे कापली होती. पर्यावरणवाद्यांनी त्याविरोधात मोठाच उद्रेक केला होता. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले, ‘आरे’चे जंगल तसेच राहील. मेट्रोची कारशेड कांजूरमार्ग येथे उभी राहील. पर्यावरणप्रेमींना सुखावणारा हा निर्णय घेतल्याने सध्या सरकारचे प्रचंड कौतुक सध्या होत आहे. असं अग्रलेखात म्हटंल आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणतात हा निर्णय दुर्दैवी आहे. केवळ अहंकारातून घेतलेला निर्णय आहे. देवेंद्र फडणवीसजी तुम्ही जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री होता तेव्हा पर्यावरणप्रेमींनी आरेचे जंगल वचवण्यासाठी आंदोलन केलं. कपलेल्या झाडावर डोके टेकुन अश्रू ढाळले. हा अहंकार होता काय?, असा सवाल शिवसेनेनं सामनामधून देवेंद्र फडणवीसांना केला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
‘या’ कारणासाठी विस्फोटक फलंदाज ख्रिस गेल रूग्णालयात दाखल
“सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर….”
राॅयल चैलेंजर्स बेंगलोरची गाडी सुसाट; कोलकाता नाईट रायडर्सवर 82 धावांनी मात
शिवसेनेच्या ‘या’ नेत्याला कोरोनाची लागण