मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे चांगले मुख्यमंत्री होते. मात्र सध्या मुख्यमंत्रिपदासाठी ते उतावीळ झाले असून, त्यांच्याकडून चुकीची पावलं टाकली जात आहेत., असं वक्तव्य मुंबईचे माजी पोलिस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांनी केलं आहे.
माजी मुख्यमंत्री, आता विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः कार्यकाळात गृहमंत्री म्हणून लागू केलेल्या कायद्याचा भंग करू नये, असं ज्युलिओ रिबेरो म्हणाले. रिबेरो यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’मध्ये लेख लिहिला आहे.
रेमडेसिव्हीर इंजेक्शन तुटवड्या ब्रूक फार्मा कंपनीच्या संचालकांना जेव्हा पोलिसांनी चौकशीसाठी आणले, त्यावेळी देवेंद्र फडणवीस हे रात्री उशिरा पोलीस स्टेशनला गेले. खरंतर रेमडेसिव्हीर इंजेक्शन कोणाला वैयक्तिक किंवा संघटनांना मिळत नाही., असं रिबेरो यांनी म्हटलं.
तुम्ही हे वाचलंत का?
“शिवसेना खासदार संजय राऊत यांना ‘मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती पुरस्कार’ जाहीर”
दरम्यान, मी आधीच म्हटल्याप्रमाणे कोव्हिड संकटात केवळ राज्य सरकारलाच फॅक्टरीतून इंजेक्शन वितरकांपर्यंत पोहोचवण्याचा अधिकार आहे. मात्र, तरीही ब्रूक फार्माच्या पाच वेगवेगळ्या गोदामांमध्ये इंजेक्शन्सचा साठा कसा आढळून आला, हा स्वतंत्र चौकशीचा विषय आहे., असंही रिबेरो यांनी या लेखात म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
केंद्रीय महिला आयोगाने संजय राऊतांची चौकशी करावी- चंद्रकांत पाटील
“अनिल देशमुखांवर झालेली कारवाई ही सोची समझी चाल, लवकरच दूध का दूध, पाणी का पाणी होईल”
“माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचं घर आणि इतर मालमत्तेवर सीबीआयची धाड”