मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलं आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
कोकणातील जनतेला भरपाई देणार आहोतच. परंतु, महाराष्ट्राला जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे आग्रह धरला पाहिजे. त्यांनी तसे केले तर ते राज्यातील जनतेसोबत आहेत हे सिद्ध होईल, असं नवाब मलिक म्हणाले आहेत.
विरोधी पक्ष वैफल्यग्रस्त मानसिकतेतून टीका करत आहे हे काल मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे. राज्यसरकारची यंत्रणा, प्रशासन कोकणातील नुकसानीचा अंदाज घेत आहे. पंचनामे करत आहे. पालकमंत्री सातत्याने संपर्कात आहेत. मुख्यमंत्र्यांनी काही भागाचा दौरा केल्यानंतर त्याचा अंदाज पंचनाम्याच्या माध्यमातून येईल. त्यानंतर निश्चितरुपाने एनडीआरएफ, एसडीआरएफच्या स्टँडींग ऑर्डरपेक्षा त्याव्यतिरिक्त अतिरिक्त मदत देण्याची राज्यसरकारची भूमिका असेल, असंही मलिक यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”
एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल
“नवाब मलिक प्रकरण गंभीर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी चाैकशी करा”
पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या अहंकारामुळे देशाची स्मशानभूमी बनली- नाना पटोले