देवेंद्र फडणवीस वेश बदलून एकनाथ शिंदेना भेटायचे; अमृता फडणवीसांचा गौप्यस्फोट

0
335

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील  सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री झाल्याने अनेकांना मोठा आश्चर्याचा धक्का बसला. यानंतर याबाबत आता देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस रात्री वेश बदलून शिंदेना भेटायला जायचे. हुडी आणि गॉगल घातला की ते मलाही ओळखू यायचे नाही, असा गौप्यस्फोट अमृता फडणवीस यांनी यावेळी केला आहे.

हे ही वाचा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय चर्चांना उधाण

मला माहित होतं की देवेंद्रजी मुख्यमंत्री होणार नाही, तसेच कोणतंही पद स्वीकरणार नाहीत. उलट मला याबाबत मला गर्व वाटत होता. त्यांनी दाखवून दिलं की पदापेक्षा ते महाराष्ट्राचं हित पाहतात. त्यांनी हसतमुखाने एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री पद दिलं. याचा मला अभिमान आहे, असं अमृता फडणवीस यांनी यावेळी म्हंटलं.

दरम्यान, देवेंद्रजी नेहमी पदाच्या पलिकडे जात जनतेच्या हिताची कामं करतात, असंही अमृता म्हणाल्या आहेत.

महत्त्वाच्या  घडामोडी –

मला कोणाच्याही खास प्रेमाची गरज नाही, शिवसैनिक आमच्या पाठीशी; आदित्य ठाकरेंचा बंडखोरांना टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली, आता एकनाथ शिंदे म्हणतात…

वादग्रस्त पोस्ट प्रकरणी आपली बाजू मांडताना केतकी म्हणाली, पवार म्हणजे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here