नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली- विनायक राऊत

0
220

मुंबई : नारायण राणे यांनी मेट्रोच्या कामावरुन शिवसेनेवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देत शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी राणेंवर निशाणा साधला आहे.

नारायण राणेंसारख्या पनवतीमुळेच देवेंद्र फडणवीसांची गाडी रूळावरून घसरली. त्या नारायण राणेंनी ती सावरता येते का हे पाहावं,  असं राऊत यांनी म्हटलं आहे.

नारायण राणेला आता त्यांच्या अज्ञातवासामध्ये त्यांचा भूतकाळ आठवतोय. त्यामुळे कोंबड्या कशा कापल्या, लोकांना कसं फसवलं, चिटींग कशी केली हे सर्व आठवत असताना त्यांची बडबड, मुक्ताफळ सुरुच असतात. त्यामुळे आम्ही त्यांची दखल घेत नाही, असं म्हणत विनायक राऊत यांनी भाजप नेते नारायण राणे यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, ज्याने आयुष्यभर ठेकेदारी केली. दमदाटी करुन पैसे उकळण्याचे काम केले. चेंबूरच्या नाक्यावर बसून कोंबडी कापता कापता महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद बाळासाहेबांच्या कृपेने मिळालं, असंही विनायक राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

शिवसेनेला ढोंगीपणाचा आजार जडलाय, गेट वेल सून- अमृता फडणवीस

दिल्लीत अनाज मंडी येथे भीषण आग; 43 जणांचा मृत्यू

बलात्काऱ्यांचे एन्काऊंटर हे यंत्रणेचे अपयश- सुप्रिया सुळे

शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांकडे मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here