आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळाल्यानंतर महायुतीची सत्ता आली असून आज नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा पार पडला.
यावेळी भाजपच्या गटनेतेपदी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यावर आता त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? वाचा सविस्तर
देवेंद्र फडणवीस हे सहाव्यांदा आमदार झाले तर आता तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदी विराजमान होत आहे. ही माझ्यासाठी खूप आनंदाची बाब आहे. तितकीच जबाबदारीची पण गोष्ट आहे. मला खूप आनंद होत आहे की त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे., असं अमृता फडणवीस म्हणाल्या.
महायुती एकत्रित आहे आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांना आजपासून वाटचाल सुरू केलेली आहे. आज मला खूप आनंद होत आहे. मी त्यांच्या संघर्ष जवळून पाहीला आहे. त्यांचे जीवनच एक संघर्ष आहे. पण त्यांच्यात जिद्द आहे. चिकाटी आहे. जेव्हा काही करायचं, तेव्हा ते करून दाखवतात. त्यांच्यात खूप संयम आहे, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अटीतटित झालेल्या कर्जत जामखेडमध्ये रोहीत पवारांनी “इतक्या” मतांनी बाजी
राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार; ‘या’ दिवशी होणार शपथविधी, मोठी अपडेट समोर
काँग्रेसला मोठा धक्का; मुख्यमंत्रिपदाचा दावेदार असणाऱ्या ‘या’ मोठ्या नेत्याचाच पराभव