आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : विधान परिषदेत निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला असून भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने शिवसेना, काँग्रेसेची 21 मतं फोडत महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला. या निकालानंतर भाजप आणि महाविकास आघाडी यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सूरू आहेत. यावरून आता भाजप आमदार रवी राणा यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
येत्या दोन महिन्यांमध्ये देवेंद्र फडणवीस योग्य वेळी करेक्ट कार्यक्रम करणार असून ते मुख्यमंत्री होतील, असा दावा रवी राणा यांनी यावेळी केला.
हे ही वाचा : विधान परिषद निवडणूक निकाल! भाजपाचे पाच उमेदवार विजयी, तर काँग्रेसला मोठा धक्का
विधिमंडळाच्या आगामी अधिवेशनात महाविकास आघाडी सरकारविरोधात अविश्वास ठरवा आणला जाईल. शिवसेना आणि काँग्रेसची मतं फुटल्याचं समोर आलं आहे. या सरकारला पायउतार व्हावे यासाठी योग्यवेळी करेक्ट कार्यक्रम केला जाईल, असा इशारा रवी राणांनी यावेळी सरकारला दिला.
महत्त्वाच्या घडामोडी –
MLC Elections 2022! शिवसेनेच्या दोन्ही शिलेदारांचा विजय, राज्यसभेचा वचपा काढला”
राज ठाकरे यांच्यावर लिलावती रूग्णालयात शस्त्रक्रिया पुर्ण; राज यांची प्रकृती स्थिर
भाजपचे आमदार आमच्या संपर्कात; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याचा दावा