मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे.
कोरोनामुळे 3 ऑगस्टपासून पावसाळी अधिवेशन घेण्याचा विचार आहे, तेव्हा कोरोनाची स्थिती नेमकी कशी असेल हे आताच सांगता येणार नाही. त्यामुळे तेव्हाची स्थिती पाहून अधिवेशनाचा कालावधी किती ठेवायचा याचा निर्णय घेतला जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, पुरवणी मागण्यांसाठी जर एक दिवसाचं अधिवेशन बोलवण्याचं सरकारचं नियोजन असेल, तर त्यालाही पाठिंबा आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.
महत्वाच्या घडामोडी-
सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला चपराक दिली; देवेंद्र फडणवीसांची राज्यसरकारवर टीका
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून कोकण दौऱ्यावर
महाराष्ट्रात सर्कस सुरू असल्याचं पवारांना मान्य- चंद्रकांत पाटलांचं पवारांना टोला