आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : इंधनाचे मोठ्या प्रमाणात वाढलेले दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारनंतर, राज्य सरकारने देखील पेट्रोल डिझेलवरील मूल्यवर्धित करात किरकोळ कपात केली.
केंद्र सरकारानं पेट्रोल 9.5 रू., तर डिझेल 7 रूपयांनी कमी केलं. तर राज्य सरकारनं पेट्रोल 2.08 रू,. तर डिझेल 1.44 रूपयांनी कमी केलं. यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
हे ही वाचा : रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती. देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के! इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा. पण नाही! याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’! , असं ट्विट करत फडणवीसांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला.
इंधन दरकपात करताना केंद्र सरकारने 2,20,000 कोटी रुपयांचा आर्थिक भार घेतला असताना किमान महाराष्ट्राच्या आर्थिक लौकिकाला साजेशी घोषणा अपेक्षित होती.
देशाच्या जीडीपीमध्ये आपला वाटा 15 टक्के!
इंधन दर कपातीत किमान 10% तर भार घ्यायचा.
पण नाही!
याला म्हणतात ‘उंटाच्या तोंडात जिरे’! https://t.co/UTPQTPNhoB— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) May 22, 2022
महत्वाच्या घडामोडी –
“राज ठाकरेंची मॅच फिक्स असते, शिवसेनेच्या नेत्याला बोलल्यावर तुम्हांला का मिरच्या झोंबल्या”
“आता थोड्याच वेळात गरजणार राजगर्जना; राज यांच्या सभेआधीच वसंत मोरे यांचं बाईकवरून शक्तीप्रदर्शन”
मनसेत झारीतील शुक्राचार्याचा शोध घ्यायला हवा; राज यांच्या सभेपूर्वीच वसंत मोरेंचा गंभीर आरोप