Home महाराष्ट्र “देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”

“देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचं सोडून द्यायला हवं”

मुंबई : वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काही दिवसांपूर्वी राज्यात पुन्हा लॉकडाऊन लवण्याचा इशारा दिला. यानंतर भाजपने लॉकडाऊन केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, असं म्हणत आक्रमक पवित्रा घेतल्याचं पहायला मिळालं. तसेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी देखील कोरोनावर लॉकडाऊन हा पर्यांय नसल्याचं म्हटलं होतं. यावरून आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून फडणवीस तसेच भाजप नेत्यांना धारेवर धरलं आहे.

लॉकडाऊन केलं तर आम्ही रस्त्यावर उतरू, तांडव करू, असा इशारा भाजपचे नेते देत आहेत. मात्र, विरोधी पक्षाच्या या तांडवामुळे दुष्परिणाम हे जनतेलाच भोगावे लागतील, असं म्हणत शिवसेनेनं भाजप नेत्यांना चांगलंच सुनावलं आहे.

दरम्यान, राज्यात सर्वाधिक मृत्यू हे नागपुरमध्ये होत आहेत. मंगळवारी एकट्या नागपुरात कोरोनामुळे 54 रुग्णांनी जीव गमावला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी फालतू राजकारण करायचे सोडून द्यायला हवे. एकमेकांना सहकार्य करून राज्यातील लोकांचे प्राण वाचवायला पाहिजेत, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

देवेंद्र फडणवीस ही दुतोंडी भाषा योग्य नाही- नवाब मलिक

“तब्बल 11 तासानंतर सांगलीतील बिबट्या अखेर जेरबंद

गृहमंत्र्यांवरील आरोपांची चौकशी करणारी समिती म्हणजे निव्वळ धूळफेक- देवेंद्र फडणवीस

“महाविकासआघाडीचे नेते फक्त पैसा कमवायच्या मागे, मुख्यमंत्री कशातच लक्ष घालत नाहीत”