देवेंद्र फडणवीसांनी कुत्र्या-मांजराचा खेळ खेळू नये; एकनाथ खडसेंचा हल्लाबोल

0
175

जळगाव : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशातच रूग्णांना बेड उपलब्ध होत नसल्या कारणाने प्रशासनावर टीका करत आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकार आणि विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया देत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर संकट आलं जसं की किल्लारीचा भूकंप, मुंबईमध्ये झालेला 26/11 चा हल्ला किंवा रेल्वेमध्ये झालेले 16 बॉम्बस्फोट अशा अनेक प्रसंगाच्या वेळेस राजकारण बाजूला सोडून विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांनी हातात हात घालून कामं केलं असल्याचं खडसे म्हणाले. ते जळगावमध्ये बोलत होते.

तुम्ही हे वाचलात का?

देशात लाॅकडाऊन करण्याबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

दरम्यान, त्यावेळच्या कालखंडामध्ये मी विरोधी पक्षात होतो, विरोधी पक्षनेता होतो. पण अशा संकटामध्ये कुत्र्या मांजराचा खेळ आम्ही खेळलो नाही. देवेंद्र फडणवीस जे करत आहेत ते विरोधी पक्षनेत्याकडून अपेक्षित नाही, असं म्हणत खडसेंनी फडणवीसांवर टीकास्त्र सोडलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“जंतू पार्सल पाठवतो मातोश्री वर, पहिला प्रयोग तुझ्या घर कोंबडा मुख्यमंत्र्यावर कर”

“मला जर कोरोनाचे जंतू सापडले असते, तर मी ते फडणवीसांच्या तोंडातच कोंबले असते”

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याला ताब्यात घेतले यात पोलिसांचा काय दोष?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here