देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि छापण्याची हिंमत दाखवावी- संजय राऊत

0
188

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. यावरुन देवेंद्र फडणवीस यांनी ही मुलाखत म्हणजे मॅच फिक्सिंग किंवा नुरा कुस्तीसारखी आहे अशी टीका केली. या टीकेला संजय राऊत यांनी उत्तर दिलंय. ते ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलत होते.

तुमचीही वृत्तपत्रं आहेत, देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांची मुलाखत घ्यावी आणि मुलाखत छापण्याची हिंमत दाखवावी, पाहुयात ते मुलाखत देतात का, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत यांनी फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, धारावीत कोरोना नियंत्रणात आला त्यामागे इतर अनेक बिगर सरकारी संस्थांचीही मदत आहे, फक्त संघाने त्याचं श्रेय घेऊ नये, असा टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

…तर राष्ट्रवादीच्या 20 आणि काँग्रेसच्या 10 जागा आल्या असत्या; चंद्रकांत पाटलांची शरद पवारांवर टीका

पुण्यात लॉकडाऊनची नियमावली जाहीर; काय सुरु काय बंद?

देवेंद्र फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांच प्रत्यृत्तर; म्हणाले…

“महाराष्ट्रात दिलदार मुख्यमंत्री; फडणवीसांना सत्ता गेल्याचं सहन होईना”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here