Home महाराष्ट्र वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवलं-...

वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवलं आणि नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवलं- देवेंद्र फडणवीस

पालघर : वर्गात पहिल्या आलेल्या विद्यार्थ्याला बाहेर बसवून नापास झालेल्या विद्यार्थ्यांना सत्तेत बसवण्यात आलं आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. पालघरमध्ये आयोजित भाजप मेळाव्यात ते बोलत होते.

सरसकट कर्जमाफी, विनाअट कर्जमाफी, सातबारा कोरा करु,  अशा घोषणा देण्यात आल्या होत्या. पण त्या घोषणा हवेत विरल्या. सत्तेवर असलेल्या पक्षांनी फक्त जनादेशाचा अपमान केला नाही तर शेतकऱ्यांशी आणि जनतेशी फसवणूक केली आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

जनादेश मिळूनही आम्हाला बाहेर बसाव लागलं. शिवसेनेनी आमच्याशी बेईमानी केली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पण त्यात जाचक अटी घालून शेतकऱ्यांची फसवणूकही केली आहे. अशी टीका देवेंद्रे फडणवीस यांनी केली आहे.

दरम्यान, हे सरकार फार काळ काही टिकणार नाही. उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना शब्द दिला होता की मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या साथीने होईल असा शब्द दिला होता का?, असा प्रश्नही फडणवीस यांनी ठाकरेंना विचारलाय.

महत्वाच्या घडामोडी-

-“भीमा कोरेगावमध्ये दंगल घडवण्याचा डाव आम्ही उधळून लावला”

-“भीमा कोरेगाव हिंसाचाराला देवेंद्र फडणवीस यांची फूस होती”

-“तुम्ही संपूर्ण वेळ ठाकरेंना खुश करण्यासाठी घालवला तेच ठाकरे तुमच्यावर थुंकले”

-‘हा’ नेता म्हणतोय शंभर टक्के सांगतो महायुतीचं सरकार पुन्हा येईल