देवेंद्र फडणवीस म्हणाले मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही; पंकजा मुंडे म्हणतात…

0
827

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

औरंगाबाद : नवी मुंबईतील एका कार्यक्रमात विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी मुख्यमंत्री नाही असं वाटतंच नाही, असं वक्तव्य केलं होतं. यावर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली. ओबीसींच्या विभागीय मेळाव्याला संबोधित केल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

जनतेच्या मनातला शब्द तुम्ही खेचू शकत नाही, असं पंकजा मुंडे म्हणाल्या. पंकजा मुंडे यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, जनतेने मला कधीच जाणवू दिले नाही की, मी मुख्यमंत्री नाही. मी आजही मुख्यमंत्री आहे असेच मला वाटते, असे फडणवीस म्हणाले. मागील दोन वर्षांपासून मी राज्यभरात दौरे करीत आहे. या दरम्यान आजही मला जनता किती प्रेम करते हे दिसते. शेवटी माणूस कोणत्या पदावर आहे ते महत्त्वाचे नाही, असं फडणवीस म्हणाले होते.

महत्वाच्या घडामोडी –

भाजपचा काँग्रेसला मोठा धक्का; मराठवाड्यातील ‘या’ माजी मंत्र्यांचे बंधू भाजपच्या वाटेवर

“जनतेनं मला कधीच जाणवू दिलं नाही की, मी मुख्यमंत्री नाही, मी आजही मुख्यमंत्री आहे असंच मला वाटतं”

“विराट कोहलीनंतर आता ‘हा’ भारतीय खेळाडू आयपीएलचं कर्णधारपद सोडणार?”

“पालघरमध्ये शिवसेनेत इनकमिंगला सुरूवात, अपक्ष नगरसेवकाचा शिवसेनेत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here