विद्या चव्हाण-अमृता फडणवीसांच्या वादावर देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले…

0
426

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : भाजप महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह ट्वीट केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. आशातच राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांनी निषेध व्यक्त करताना त्यांनी त्यात अमृता फडणवीस यांनाही याप्रकरणात ओढलं आहे.

हे ही वाचा : “केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना कोरोनाची लागण, ट्विट करत दिली माहिती”

रश्मी ठाकरेंना राबडी देवींची उपमा दिली हे बरे झाले. म्हणजे एका प्रकारे त्यांनी भाजपाचे महाराष्ट्र सोशल मीडिया प्रभारी जितेन गजारिया यांची साथ दिली. फडणवीसांच्या पत्नीची उपमा दिली असती तर ती नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांची प्रतिमा झाली असती. निदान रश्मी ठाकरेंची वाईट प्रतिमा नाहीये. यानंतर अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. आता या प्रकरणावर विरोधी पक्षनेते व अमृता फडणवीस यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली.

महिला कोणतीही असो त्यांच्याबदद्ल बोलताना काळजी घेतली पाहिजे. केवळ पक्षांनीच नाही तर महिलांबाबत वक्तव्य करताना सर्वांनीच मर्यादा पाळायला हवी., असं फडणवीस यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी – 

“खासदार संजय राऊत यांच्या संपर्कात माजी आमदार, लवकरच शिवबंधन हाती बांधणार”

भाजप नेते आशिष शेलारांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

“भाजप नेते आशिष शेलार यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here