मुंबई : देवेंद्र फडणवीस यांना कदाचित WHO ही मार्गदर्शनासाठी बोलावू शकते, असा खोचक टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला. माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या एबीपी माझाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
देवेंद्र फडणवीस यांनी आज पुरेशा चाचण्या होत नाहीत महाराष्ट्रात करोना मृत्यूंचं प्रमाण वाढलं आहे, करोनावर उपाय योजना करण्यात काहीसं अपयश आलंय असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. त्याबाबत विचारलं असता देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू आहेत. बडी आसामी आहे. त्यांना कदाचित WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटनाही मार्गदर्शनासाठी बोलावतील, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, करोनाचं संक्रमण रोखणं, त्याचा वेग मंदावणं हे महत्त्वाचं आहे. गर्दी टाळा, सतत हात धुवा, मास्क लावा हे सगळे नियम पाळा असं वारंवार सांगितलं जातं आहे. आपण सध्या अनलॉकच्या प्रक्रियेतच आहोत. काही ठिकाणी पुन्हा लॉकडाउन करावं लागलं कारण ते करोनाच्या प्रसारावर अवलंबून होतं. त्यामुळे तिथे लॉकडाउन करावा लागला, असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
देवेंद्र फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण त्यांना नवरीच मिळेना-प्रकाश आंबेडकर
स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला
कोरोना रूग्णांच्या मदतीला धावणाऱ्या मनसेच्या ‘या’ नेत्याला 2 वर्षे तडीपारची शिक्षा
“कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल”