मुंबई : 2 दिवसांपुर्वी मोदी सरकारच्या मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला. यात महाराष्ट्रातील 4 नेत्यांना मंत्रीपद देण्यात आलं. यामध्ये डाॅ. भागवत कराड यांचाही समावेश आहे. मात्र प्रीतम मुंडे व पंकजा मुंडे यांना यात स्थान देण्यात आलं नाही. त्यामुळे मुंडे भगिनी नाराज असल्याचं म्हटलं जात आहे. तसंच या सर्व प्रकरणात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचं राजकीय डोकं असल्याचंही म्हटलं जात आहे. यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने पंकजा मुंडे यांचे पंख छाटले. एकनाथ खडसे यांना बाद केलं. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत जे जे नेते होते. त्यांना राजकीय जीवनातून उद्धवस्त करण्याचं काम फडणवीसांनी केलंय, असा आरोप विनायक राऊत यांनी यावेळी केला.
दरम्यान, आजही भाजपने पंकजा मुंडेना राजकारण आणि समाजकारणाच्या बाहेर फेकून दिलंय, अशी टीकाही विनायक राऊत यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने व राजकीय हेतूने चाैकशी, ते ईडीला घाबरत नाहीत”
“पाकिस्तानमध्ये 58 रूपये लीटर पेट्रोल असताना, भारतामध्ये 106 रूपये का?”
“पदभार स्वीकारल्यावर नारायण राणेंचा पहिल्याच दिवशी कामाचा धडाका, अधिकाऱ्यांना घेतलं फैलावर”
“संजय राऊतजी, महिलांची तुलना करताना भान ठेवा, अन्यथा आम्हांलाही आरेला कारे करण्याची भाषा येते”