देवेंद्र फडणवीस लग्नासाठी उतावीळ, पण त्यांना नवरीच मिळेना-प्रकाश आंबेडकर

0
169

मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लग्नासाठी उतावीळ झाले आहेत. मात्र त्यांना नवरीच मिळेना अशी त्यांची अवस्था झाली आहे, अशी खोचक टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केलीच. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

प्रकाश आंबेडकर यांनी परवाच अकोल्यात न्हाव्याकडे जाऊन केस कापून घेतले आणि लॉकडाउनला विरोध दर्शवला. लॉकडाउन असाच कायम राहिला तर करोनापेक्षा लोक उपासमारीने मरतील असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. लॉकडाउनचा सगळ्यात मोठा फटका हा कामगार आणि पारंपारिक व्यापाऱ्यांना बसला आहे त्यांना सरकारने मदत केली पाहिजे, अशी मागणी त्यांनी आज केली.

दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडून पुन्हा भाजपाचे सरकार आणण्याचा प्रयत्न राज्यात सुरु आहे का? असा प्रश्न प्रकाश आंबेडकर यांना पत्रकारांनी विचारला. त्या प्रश्नाला त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

स्टिअरिंगवरील हात निसटला तर गाडी झाडावर आदळणार; रावसाहेब दानवेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

कोरोना रूग्णांच्या मदतीला धावणाऱ्या मनसेच्या ‘या’ नेत्याला 2 वर्षे तडीपारची शिक्षा

“कोकणातील जनतेच्या असंतोषाची किंमत शिवसेनेला मोजावी लागेल”

हे सरकार फार काळ टिकेल असं वाटत नाही- राज ठाकरे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here