राळेगणसिद्धी : शेतकरी हिताच्या मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येत्या 30 जानेवारीपासून राळेगणसिद्धीत उपोषण करणार आहेत. या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी हजारे यांची भेट घेतली.
देवेंद्र फडणवीस अण्णा हजारे यांची सुमारे एक तास मनधरणी केली. मात्र चर्चा, आश्वासने नकोत तर ठोस निर्णय घ्या, असे सांगत हजारे आपल्या उपोषणाच्या निर्णयावर ठाम राहिले.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांचे पत्र घेऊन माजी मुख्यमंत्री फडणवीस आले होते. मात्र पत्रात ठोस काहीही नाही त्यामुळे आपण उपोषणाच्या निर्णयावर ठाम असल्याचं हजारे यांनी स्पष्ट केलं.
महत्वाच्या घडामोडी-
आता भाजप का गप्प आहे?, राष्ट्रीय सुरक्षा इतकी स्वस्त का?; संजय राऊतांचा सवाल
साहेबांनी मोठे युद्ध जिंकलं; निलेश राणेंची धनंजय मुंडेंवर टीका
“ज्यांनी ज्यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली, त्यांना आता उत्तर मिळालं असेल”
“एवढा गंभीर विषय सत्तेच्या शक्तीसमोर दाबण्याचा प्रयत्न तर झाला नाही??”