देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नाही- रुपाली चाकणकर

0
1464

मुंबई  : भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे मराठवाड्यातील पाणी प्रश्नी उपोषणाला बसल्या होत्या. यावेळी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हजेरी लावली होती. देवेंद्र फडणवीस यांचा हातात बूट घेऊन माध्यमांशी बोलतानाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोव राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फेसबुक पोस्ट करत फडणवीसांचा चांगलांच समाचार घेतला.

देवेंद्र फडणवीसांचा आपल्याच कार्यकर्त्यांवर विश्वास नसून चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केलं असावं, असं म्हणत रुपाली चाकणकर यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जी आपण गेली पाच वर्षे राज्याचा विकास किती जलदगतीने केलाय, हे घसा ताणुन सांगत होता. प्रत्येक भाषणात महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे हे ढोल बडवत सांगत होता. चक्क आपण आज आंदोलनात सहभागी झालात. आपल्याच लोकांवर विश्वास नाही. चोरांच्या टोळीत बसलोय की काय असं वाटत असेल, म्हणून बुट हातात घेऊन भाषण केलं, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.

विरोधात आहेत मान्य आहे, पण महाविकासआघाडी सत्तेत येऊन महिनाच झाला आहे. पाच वर्षातील तुमच्या सत्तेतील हिशोब द्या, असंही रुपाली चाकणकर यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

दुष्काळमुक्त मराठवाडा हे गोपीनाथ मुंडे साहेबांचं स्वप्न होतं- देवेंद्र फडणवीस

“कानाखालचा रंग बदलणं काय असतं हे ओवैसींना महाराष्ट्रात आल्यावरच कळेल”

बाळासाहेब ठाकरे हे माझे गुरु, त्यांच्या तलमीत मी तयार झालो- नारायण राणे

राजसाहेबांनी बोट ठेवल्यामुळे झालेले जुलाब सामन्याच्या अग्रलेखातून बाहेर पडत्यात- संदिप देशपांडे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here