“देवेंद्र फडणवीस आणि नारायण राणे हे आता जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत बसतील”

0
285

परभणी : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेते नारायण राणे हे जोडीने मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत असल्याची मिश्किल टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. ते  परभणीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

राज्यात स्वप्न पाहणारी मंडळी वाढत चालली आहेत. गेल्या 22 वर्षांपासून नारायण राणे मुख्यमंत्रीपदाचं स्वप्न पाहत आहेत. त्यांना आता जोडीदार म्हणून देवेंद्र फडणवीस भेटलेत, असा टोला नवाब मलिक यांनी यावेळी लगावला.

दरम्यान, शिवसेनेशी फारकत घेतल्यापासून भाजपची अवस्था काय आहे, हे सगळ्यांनाच चांगले माहिती आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस वारंवार आम्ही भविष्यात फासे फिरवू, अशी भाषा करत आहेत. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या पूर्वजांनी ज्योतिष विद्या कुठून शिकली, हे आम्हाला माहिती नाही. पण आमचा ज्योतिष विद्येवर विश्वास नसल्याचे नवाव मलिक म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी 

फिरकीसमोर इंग्लंडचं लोटांगण! टीम इंडियाचा इंग्लंडवर धमाकेदार विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी

“संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना तात्काळ अटक करा”

“कोरोनापेक्षाही जास्त घातक भाजप”

हे तर……महा गा य ब सरकार! चित्रा वाघ यांची राज्य सरकारवर टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here