सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही- देवेंद्र फडणवीस

0
438

मुंबई : विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारमधील पक्षांमध्ये आपापसांतच सुसंवाद नाही. त्यामुळे त्यांनी आधी आपापसांत संवाद साधावा, मग आम्हाला चहापानासाठी, सुसंवादासाठी बोलावावं, असं म्हणत सरकारवर निशाणा साधला आहे.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महाविकास आघाडी सरकारकडून भाजपला चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र विरोधी पक्षाने या कार्यक्रमावर बहिष्कार टाकत मुख्यमंत्र्यांच्या चहा-पाण्याला जाण्याची आम्हाला गरज नाही, असं म्हटलं आहे.

सरकार स्थापन झाल्यापासून जे काही काम पहायला मिळालं त्यामध्ये असं दिसलं की सरकारला अजून दिशा गवसलेली नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

महत्वाच्या घडामोडी-

वारिस पठाण औरंगजेबाचे वारिस; त्यांना 100 मावळे अडचणीत आणतील-सुधीर मुनगंटीवार

दोन भाऊ वेगळे झाले तरीही नातं तुटत नाही- चंद्रकांत पाटील

“…तर मी देवेंद्र फडणवीस यांना ‘भाऊ’ म्हणून हाक मारेन”

ठाकरे सरकारचा रिमोट माझ्या हातात नाही- शरद पवार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here