भाजप आणि शिवसेनेचं सरकार असतानाही खटके उडत होते; संजय राऊतांच फडणवीसांना उत्तर

0
158

मुंबई : भाजप आणि शिवसेनेचं सरकार याआधी राज्यात होतं. त्यावेळी आमच्यातही खटके उडत नव्हते का? खटके उडतच होते, असं म्हणत शिवसेना नेते संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांना उत्तर दिलं आहे.

महाविकास आघाडीत तीन पक्ष आहेत. आमच्यात खटके उडत नाहीत. खटका हा शब्द प्रसारमाध्यमांनी दिलाय. तीन पक्षांपैकी एकाही पक्षाने खटका हा शब्द वापरलेला नाही, महाविकास आघाडीच्या नेतृत्वात मतभेद नाहीत, असं संजय राऊत म्हणाले.

देवेंद्र फडणवीस जे शब्द वापरत आहेत त्या शब्दांचा अर्थ तितकासा खरा नाही, तीन प्रमुख पक्षांनी हे सरकार बनवलं आहे, ही खिचडी नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,पारनेरमध्ये जे नगरसेवक फुटले ते अजित पवारांनी फोडले असं म्हणता येणार नाही, असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं. तसंच यापुढे असा काही मुद्दा असेल तर आपसात चर्चा करावी. हा मुद्दा अत्यंत स्थानिक पातळीवरचा होता. यावरुन मुख्यमंत्र्यांनी अजित पवार यांना कोणताही फोन केलेला नाही, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस यांना वाटते तशी परिस्थिती नाही- रोहित पवार

“महसूलमंत्री बाळासाहेब थोरात होम क्वारंटाईन”

…मग मुख्यमंत्री घरीच का?; चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना टोला

हे सरकार नाही सर्कस आहे; नितेश राणेंचं महाविकास आघाडीवर टीकास्त्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here