Home महाराष्ट्र “देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”

“देशमुखांचा राजीनामा ही तर सुरुवात, आगे आगे देखो होता है क्या?”

मुंबई : भ्रष्टाचाराच्या आरोपांबाबत अनिल देशमुख यांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिल्यानंतर देशमुख यांनी सोमवारी राज्याच्या गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यावरून भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधलाय.

राज्यातील वसुलीबाज ठाकरे सरकारमधील मंत्री अनिल देशमुख यांना हायकोर्टाच्या दणक्याने राजीनामा द्यावा लागला आहे. ही तर अजून सुरूवात असून पुढे अजून बरेच गैरव्यवहारांची प्रकरणे येणार. आगे आगे देखो…होता है क्या?,” असं महाजन यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, एका एपीआयला 100 कोटींचे टार्गेट देणारे हे खंडणीबाजांचे सरकार आहे. खरं तर हा आरोप झाल्यानंतर अनिल देशमुख यांनी नैतिकता दाखवून राजीनामा देण्याची गरज होती. भाजपाच्या वतीने माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासह आम्ही सर्वांनी ही मागणी केली होती, असंही महाजन म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

“कठोर निर्बंधांच्या नावाखाली अप्रत्यक्ष लॉकडाऊन, सरकार महाराष्ट्राची फसवणूक करतंय”

दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेविना पुढच्या वर्गात टाका; राज ठाकरेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

येत्या 8 दिवसात तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा होणार; चंद्रकांत पाटलांचा दावा

चित्राताईंचा नवरा भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यात आणि ताई विचारतायत नवा वसुली मंत्री कोण?- रूपाली चाकणकर