Home महाराष्ट्र उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

उपमुख्यमंत्री म्हणून लाज वाटली पाहिजे की…; निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल

मुंबई : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना भयंकर त्रास झाला. बहुजन समाजातून आलेला हा नेता. त्यांच्या मागे कुटुंब अक्षरश: पाच सहा दिवस अडचणीत आले. डिस्टर्ब झाले. याला कुणी वाली आहे की नाही, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं होतं. यावर भाजप नेते निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

यात कुठल्याही समाजाचा विषय आला कुठून? मनात आले तसे काही बोलायचं? एक उपमुख्यमंत्री हे बोलतोय. लाज वाटली पाहिजे एक फालतू विषय समाजाशी जोडायला. आम्हाला मंत्रांच्या वैयक्तिक जीवनाशी काही घेणं देणं नाही पण त्यांनी प्रतिज्ञापत्रात माहिती लपावल्यामुळे त्यांची आमदारकी रद्द झाली पाहिजे., असं ट्विट करत निलेश राणेंनी अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

खचलेल्या मराठी माणसाला बाळासाहेब ठाकरेंनी लढण्याचं बळ दिलं- संजय राऊत

“आघाडीत बिघाडी करायची नाही, त्यामुळे मला मुख्यमंत्री होण्याची घाई नाही”

“जनतेसाठी जो झटतो, त्याला लोक कधीही विसरत नाहीत”

झाडावरील पानही पडले तरी पान का पडले म्हणून भाजप आंदोलन करु शकताे- जयंत पाटील