मुंबई : महाविकास आघाडी सरकारवर नाराज असणाऱ्या 11 आमदारांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हस्तक्षेप केल्यामुळे नाराज झालेल्या आमदार कैलास गोरंटयाल यांची अजित पवार यांनी भेट घेतली.
अजित पवार यांनी माझ्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला होता. मंगळवारी त्यांनी भेट घेऊन संवाद साधला. जालना नगरपरिषदेच्या निधीबाबत होणारा अन्याय दूर करण्याचे आश्वासन अजित पवार यांनी दिले, असं कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, काँग्रेसच्या अन्य नाराज आमदारांच्या संदर्भातही विकास निधीबाबत अन्याय होणार नाही, असंही अजित पवार यांनी सांगितले, असंही कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“विविध मागण्यांसाठी नर्सेसचं राज्यव्यापी दोन तास कामबंद आंदोलन”
रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांना कोरोनाची लागण
अनैसर्गिक युतीची आहे, जास्त काळ टिकणार नाही; देवेंद्र फडणवीसांच महाविकास आघाडी सरकारवर टिकास्त्र