आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्य शासनात विलिनीकरणाच्या मागणीसाठी पाच महिन्यांपासून आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईमधील सिल्व्हर ओक या निवास्थानाबाहेर आंदोलन सुरू केलं. यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पवारांच्या निवासस्थानावर चपला देखील फेकल्या. या घटनेचे तीव्र पडसाद महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उमटू लागले आहेत. यावरून आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जे काही सिल्व्हर ओकवर घडलं, ती आपली शिकवण नसल्याचं अजित पवार म्हणाले आहेत. कुणाच्याच बाबतीत असं घडता कामा नये. मग तो आमचा सर्वसामान्य नागरीक असेल, तो कुठल्याही पक्षाचा असेल किंवा स्वतंत्र विचारांचा असेल., असं अजित पवार म्हणाले.
हे ही वाचा : “आज सुप्रिया सुळेंमध्ये इंदिरा गांधी दिसल्या”
दरम्यान, ही आपली सगळ्यांची परंपरा, शिकवण आहे. असं असताना हे जे काही घडलंय, याच्यामागे निश्चितपणे शेवटपर्यंत जाऊन दूध का दूध, पानी का पानी दाखवून देऊ, असंही अजित पवार म्हणाले. तसेच याच्यामागचा मास्टरमाईंड कोण आहे? कोण चिथावणीखोर भाषणं देत होतं?, असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला.
महत्वाच्या घडामोडी –
“INS विक्रांत घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांना पोलिसांकडून समन्स, उद्या चाैकशीसाठी हजर राहणार”
“एसटी आंदोलन; अॅड. गुणरत्न सदावर्ते पोलिसांच्या ताब्यात”
“…त्यामुळे राज ठाकरेंना अटक करुन जेलमध्ये टाका”; अबू आझमी