“संभाजी भिडे यांना महाराष्ट्रातून तडीपार करा”

0
336

मुंबई : कोरोना म्हणजे थोतांड आहे. सरकार हे थोतांड का वाढवत आहे कळत नाही, मात्र हे सर्व देशात चाललेले षडयंत्र आहे, असं शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी म्हटलं. तसंच रस्त्यावर उतरले पाहिजेत, मंदिराची कुलुपे तोडायला हवीत, असंही संभाजी भिडे म्हणाले. यावर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (खरात) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी प्रतिक्रिया दिली.

संभाजी भिडे महाविकासआघाडी सरकार आल्यापासून समाजव्यवस्था बिघडेल अशी वक्तवे करत आहेत. इतकंच नाही तर आता तर संभाजी भिडे म्हणतात कोरोना म्हणजे थोतांड आहे, मंदिराचे कुलूप तोडा आणि वारकऱ्यांनी रस्त्यावर उतरा, असं चिथावणीखोर वक्तव्य केल्यामुळे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना महाराष्ट्रातून तडीपार करा, अशी मागणी सचिन खरात यांनी यावेळी केली.

दरम्यान, सचिन खरात यांनी संभाजी भिडे यांना तडीपार करण्याची मागणी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांच्याकडे केली आहे.

महत्वाच्या घडामोडी –

नाना पटोलेंची भूमिका मविआला सुरूंग लावणारी- अजित पवार

नाना पटोलेंनी स्वबळाचा नारा देताच शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या पायाखालची जमीन सरकली- प्रवीण दरेकर

“कोरोना संकट काळात उद्धव ठाकरेंसारखा मुख्यमंत्री झाला नसता, हे त्यांनी आपल्या कार्याने दाखवून दिलं”

देशात जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे; रामदास आठवले यांची मागणी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here