भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी

0
178

मुंबई : भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवावं, अशी मागणी मराठी एकीकरण समितीनं केली आहे.

लोकशाहीवरचा विश्वास कायम ठेवायचा असेल तर राष्ट्रपती आणि राज्यपाल या पदावरील व्यक्ती निष्पक्ष असावी. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मूळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे असून भाजपचे ते राष्ट्रीय उपाध्यक्ष राहिले आहेत. त्यामुळं एकीकरण समितीनं ही मागणी केली आहे.

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख, प्रदीप सामंत आदी प्रमुखांनी एकूणच सत्ता स्थापनेसाठी घडलेल्या प्रकाराचा निषेध करत भगतसिंह कोश्यारींना राज्यपाल पदावरून हटवण्याची मागणी केल्याच समोर आलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील एकूणच राजकीय घडामोडी आणि सत्ता स्थापनेचा प्रकार पाहता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी मूळचे भाजपचे असलेल्यामुळे यांना आता या सर्व समस्यांना कारणीभूत ठरवलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here