दिल्लीतील भाजप नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला; शिवसेनेचा टोला

0
438

मुंबई : दिल्लीतील काही भाजप नेत्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा काटा काढला, असं म्हणत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

दिल्लीतील काही भाजप नेत्यांनाच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री म्हणून नको होते. त्यांना ‘मी’ पणाचा जो गर्व चढला होता, याशिवाय दिल्लीतील नेतृत्वाचीही स्वप्नं पडत होती. याच कारणाने दिल्लीतील नेत्यांनी त्यांचा काटा काढला., असं म्हणत विनायक राऊतांनी फडणवीसांना टोला लगावला आहे.

दरम्यान, भाजपमधील देवेंद्र फडणवीस पुरस्कृत टवाळखोरांची विकृतबुद्धी महाराष्ट्र आणि राज्य सरकारची बदनामी करत आहे. तसचे सत्ता हातातून गेल्यानं ते असे विकृत चाळे करत आहेत, असं म्हणत विनायक राऊतांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना पुणे पोलिसांनी घेतलं ताब्यात”

सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री होणार का? यावर शरद पवार म्हणतात….

“शरद पवार एकवेळ कोरोनाबाबत निगेटीव्ह राहतील पण धनगर आरक्षणाबाबत पॉझिटिव्ह आहेत”

“MDH मसालेचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here