‘या’ कारणामुळे दिपीका पुन्हा झाली भावूक

0
367

मुंबई : दीपिका पदुकोण  सध्या ‘छपाक’ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. प्रमोशनसाठी दीपिका नुकतीच डान्स प्लस Dance + च्या लोकप्रिय रिऍलिटी डान्स शोमध्ये गेली होती.

यावेळी दीपिकासाठी स्पेशल डान्स परफॉर्मन्स डेडीकेट करण्यात आला होता. यामध्ये तिची लोकप्रिय गाणी ‘दिवानी मस्तानी’ आणि ‘घुमर’ यावर स्पेशल परफॉर्मन्स करण्यात आला. यावेळी दिपीका भावूक झाली.

 

View this post on Instagram

 

by the contestants of Dance Plus ❤️❤️ #DeepikaPadukone

A post shared by Deepika Padukone Fanpage (@deepika.padukone.fanpage) on Dec 26, 2019 at 3:57am PST

तिच्यासाठी सादर करण्यात आलेल्या या खास डान्स परफॉर्मन्सने दीपिकाला आपले अश्रू अनावर झाले. दीपिका डान्स परफॉर्मन्स बघून भावूक झाल्याच दिसत आहे. दोन्ही हाताने चेहऱ्यावर हात ठेवून दीपिका रडू लागली.

दरम्यान, थोड्या वेळाने शांत झाल्यावर दीपिकाने सगळ्या परफॉर्मसचे आभार मानले. ‘मी आतापर्यंत अनेक कार्यक्रमात गेले आहे. पण आज मी जे अनुभवलं आहे ते मी शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी फक्त मनापासून ‘धन्यवाद’  इतकंच मी म्हणू शकते, असं दिपीका म्हणाली

महत्वाच्या घडामोडी-

-गृहखातं राष्ट्रवादीला देऊ नका नाहीतर… चंद्रकांत पाटलांचा शिवसेनेला प्रेमाचा सल्ला

-भारताशी युद्ध करण्यासाठी आमचं सैन्य तयार- इम्रान खान

-भाजपच्या ‘या’ नेत्याने घेतली राज ठाकरेंची भेट; भेटीमुळे राजकीय चर्चांना उधाण

-दिल्लीत बसलेला तो शेंबडा मुलगा गतीमंद आहे- शरद पोंक्षे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here