रत्नागिरी : संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेत राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.
दरम्यान, परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तींना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी किरीट सोमय्यांनी यावेळी केली.
महत्वाच्या घडामोडी –
“माझी आई सांगत होती, एकवेळ कुत्रा पाळ पण धोकेबाज आणि घाणेरडी माणसं पाळू नकोस”
चंद्रकांत पाटलांची सीबीआय चौकशी करा; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची मागणी
मी तुम्हांला शब्द देतो की…; मुख्यमंत्र्यांचं सहायक आयुक्त कल्पिता पिंपळे यांना आश्वासन
पंकजाताई, तुमची लेकरं परदेशात शाळेत अन् आमची उसाच्या फडात; पंकजा मुंडे म्हणाल्या…