मुंबई : विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे.
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणं गरजेचं आहे, असं फडणवीस यांनी या पत्रात नमूद केलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील ज्या भागात अतिवृष्टी झाली आहे, त्या भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तेथे ओला दुष्काळ जाहीर करुन बाधित शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात केली आहे.
परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक नुकसान
या नुकसानीपोटी आता तरी केवळ घोषणा न करता शेतकर्यांना तातडीने थेट मदत देण्याबाबत मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र…#SaveFarmers pic.twitter.com/giI6pAmaAE— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) October 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
इयाॅन माॅर्गन व पॅट कमिंसची शानदार भागीदारी; कोलकाताचे मुंबई इंडियन्सला 149 धावांचे लक्ष्य
कोलकाता नाईट रायडर्सने टाॅस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करता येणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली