मुंबई : राज्यात अनेक ठिकाणी पाऊस असून अनेक मजूर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अडकले आहेत. पावसामुळे त्यांच्या अडचणीत भर पडत आहे. त्यामुळे ऊसतोड कामगारांना लवकरात लवकर घरी पाठवण्याची मागणी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. उद्याच्या उद्या निर्णय जाहीर करण्यात यावा असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलंय. आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करून त्यांच्या ताटात माती? ते हॉटस्पॉट मध्ये नाहीत न हॉटस्पॉटला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स, असं पकंजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, यासंदर्भात ट्विट करत पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारकडे ही मागणी केली आहे.
इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली,धान्य भिजलय,आज अन्न गेलं नाही गळ्याखाली!बिचारे मजूर Isolationने आजारी पडतील सर्व शिस्त पाळून,कष्ट करून त्यांच्या ताटात माती?ते हॉट स्पॉट मध्ये नाहीत न हॉट स्पॉट ला जाणार आहेत मग काय प्रॉब्लेम?उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!! pic.twitter.com/Is2bTxKnfv
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) April 16, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“अजित पवारांचं पालकमंत्र्यांना पत्र; म्हणतात…”
महाराष्ट्रातील रुग्ण वाढ आणि मृत्यूला मुख्यमंत्री जबाबदार- नरायण राणे
ही वेळ ‘ब्लेमगेम’ची नाही; अशोक चव्हाण यांचं फडणवीसांना उत्तर
“आम्हालाही मदत करा; पाकिस्तानने भारताकडे मागितला मदतीचा हात”