आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली, यानंतर राज्यातील वातावरण तापले असून यावरून राष्ट्रवादी आमदार रोहीत पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
आदरणीय पवार साहेबांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी येणं म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचं आणि सध्याचं राज्य सरकार हे नपुंसक असल्याचं सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण योग्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे, असं रोहीत पवार म्हणाले आहेत.
ही बातमी पण वाचा : निलेश राणेंची शरद पवारांवर टीका; भाजपाच्या ‘या’ नेत्याकडून घरचा आहेर
सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर या प्रकरणी थातूरमातूर कारवाई न करता धमकी देणाऱ्यांच्या आणि त्यामागील मास्टरमाईंडच्या तातडीने मुसक्या आवळल्या जातील. पण द्वेषाला खतपाणी घालणाऱ्या राज्य सरकारकडून ही अपेक्षा नाही. आज संपूर्ण महाराष्ट्र हा साहेबांसोबत आहेच पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणून आम्ही साहेबांसाठी छातीचा कोट करू, असंही रोहीत पवार म्हणाले आहेत.
आदरणीय पवार साहेबांसारख्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी येणं म्हणजे विशिष्ट घटकांवर सरकारची जरब नसल्याचं आणि सध्याचं राज्य सरकार हे नपुंसक #impotent असल्याचं मा. सुप्रीम कोर्टाने नोंदवलेलं निरीक्षण योग्य असल्याचं पुन्हा एकदा सिद्ध झालं… सरकारला थोडं जरी जबाबदारीचं भान असेल तर…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 9, 2023
महत्त्वाच्या घडामोडी –
“मोठी बातमी! रात्री 11 नंतर छत्रपती संभाजीनगर, बंद म्हणजे, बंदच; काय आहे कारण?”
“सांगलीतील, रिलायन्स ज्वेलसवर पडलेल्या दरोड्यातील 4 संशयितांची, रेखाचित्रं पोलिसांकडून जारी”
“शरद पवारांनी धर्मांतर करून मुस्लिम व्हावं”