डियर शादी डाॅट काॅम…या मुलाला मुलगी शोधण्यासाठी मदत करा; नितेश राणेंचा वरूण सरदेसाईंना टोला

0
332

मुंबई : भाजप नेते नितेश राणे यांनी सोमवारी वरुण सरदेसाई यांचे सचिन वाझे यांच्याशी आर्थिक हितसंबंध असल्याचा आरोप केला होता. यावर प्रत्युत्तर देताना नितेश राणे यांनी आरोप सिद्ध करावेत अन्यथा मी त्यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा ठोकेन, असं वरुण सरदेसाई यांनी म्हटलं होतं. यावर नितेश राणे यांनी पुन्हा पत्रकारपरिषद घेऊन वरुण सरदेसाई यांना लक्ष्य केलं आहे.

डियर शादी डॉट कॉम, हा तरुण लग्नासाठी मुलगी शोधत असल्याचं दिसत आहे. त्यामुळेच त्याने आपली व कुटुंबियांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषद घेतली आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की, त्याला मुलगी शोधण्यासाठी मदत करा, असं ट्विट करत नितेश राणेंनी सरदेसाई यांना टोला लगावला आहे.

दरम्यान, पत्रकार परिषदेतूनही राणे यांनी वरूण सरदेसाईंवर टीका केली होती. लग्नासाठी मुलगी शोधायची, तर शादी डॉट कॉमवर शोधायची, त्यासाठी पत्रकार परिषद घेण्याची काय गरज? सचिन वाझे प्रकरणाबाबत सरदेसाईंनी अवाक्षरही काढलं नाही. मी बोललो ते खरं की खोटं, याबद्दलही ते काहीच बोलले नाहीत. मग पत्रकार परिषद फक्त सुक्या धमक्या देण्यासाठी घेतली होती का, असं म्हणत राणेंनी सरदेसाईंवर हल्लाबोल केला होता.

महत्वाच्या घडामोडी –

“राजस्थान हादरलं! एका अल्पवयीन मुलीवर सलग 9 दिवस 18 जणांनी केला बलात्कार”

सचिन वाझे प्रकरणी ज्यांच्यापर्यंत धागेदोरे जातील त्यांच्यावर कारवाई होणार – अजित पवार

“शरद पवारांनीच अनिल देशमुखांना तात्काळ घरी पाठवावं”

“अहमदनगरमध्ये भाजपला धक्का; ‘या’ मोठ्या नेत्यानं केला राष्ट्रवादीत प्रवेश”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here