मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही एक व्हिडीओ ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.
काँग्रेसचे खासदार व आमचे संसदेतील सहकारी राजीवजी सातव यांचे निधन झाले. ही आम्हा सर्वांसाठी अतिशय दुःखद बातमी आहे.त्यांनी करोना विषाणूशी जोरदार झुंज दिली. पण ही झुंज अपयशी ठरली. ते एक उत्तम संसदपटू तर होतेच याशिवाय ते माणुसकी जपणारे नेते होते. त्यांच्या अकाली जाण्यामुळे महाराष्ट्राची मोठी हानी झाली आहे. लोकशाही, धर्मनिरपेक्षता व समतेच्या मूल्यांवर श्रद्धा असणारा व त्यासाठी संघर्ष करणारा एक तरुण नेता आहे पण गमावला. या कठीण प्रसंगी आम्ही सर्वजण सातव कुटुंबियांसमवेत आहोत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी दुःख व्यक्त केलं आहे.
सुप्रिया सुळे यांनी खासदार राजीव सातव यांच्यासोबतचा एक जुना व्हिडीओ पोस्ट करत. “डिअर राजीव, वुई विल मिस यू,” असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
Dear Rajeev, we will miss you. pic.twitter.com/68j5xsWjH7
— Supriya Sule (@supriya_sule) May 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
राजीव सातव तू हे काय केलंस?, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक
राजकारणातला देवमाणूस गेला; राजीव सातव यांच्या निधनाने वडेट्टीवार यांना अश्रू अनावर