दुबई : आजचा आयपीएलचा सामना सनरायर्झर्स हैदराबाद विरूद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात खेळला जात आहे. सनरायर्झर्स हैदराबादने किंग्स इलेव्हन पंजाबसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवलं आहे.
हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वाॅर्नरने टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 6 गडी गमावत 201 धावा केल्या. हैदराबादचे दोन्ही सलामीवीरांनी धमाकेदार सुरूवात केली आहे. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 15.1 षटकात 160 धावांची भागीदारी केली. जाॅनी बेअरस्टाेने 55 चेंडूत 97 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चाैकार व 6 षटकार मारले. तर डेव्हिड वाॅर्नरने 39 चेंडूत 52 धावा केल्या. अर्धशतक पूर्ण झाल्यावर वाॅर्नर फटकेबाजीच्या नादात आऊट झाला. त्याला रवी बिश्नोईने बाद केले. वाॅर्नरनंतर सेट झालेला बेअरस्टाेही आऊट झाला. नंतर आलेला मनिष पांडेही फटकेबाजीच्या प्रयत्नात आऊट झाला. केन विलियम्सनने 10 चेंडूत 20 धावा केल्या. तर अभिषेक शर्माने 6 चेंडूत 12 धावा केल्या.
पंजाबकडून रवी बिश्नोईने 3 अर्शदिप सिंगने 2, तर मोहम्मद शमीने 1 विकेट घेतली.
महत्वाच्या घडामोडी-
“शिवसेनेनं केलेला हा धोका भाजपशी नव्हे, तर महाराष्ट्राच्या जनतेशी झाला आहे”
डेव्हिड वाॅर्नर आणि जाॅनी बेअरस्टाेची नाबाद शतकी भागीदारी
“जर उदयनराजे बिनडोक ठरत असतील तर आज निम्मा देश बिनडोक ठरेल”
“ज्येष्ठ अभिनेते अविनाश खर्शीकर यांचं निधन”