“दादर हादरलं, धावत्या ट्रेनमधून तरूणीला खाली फेकलं, आरोपीला पोलिसांनी घेतलं ताब्यात”

0
370

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : मुंबईतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसमधून 29 वर्षीय तरुणीला फेकल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

दादर रेल्वे स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडली असून, या प्रकरणी आरोपीला दादर रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे.

ही बातमी पण वाचा : “ठाकरे गट-मनसे युती होणार?; उद्धव ठाकरे, लवकरच राज ठाकरेंना फोन करणार?”

मिळालेल्या माहितीनुसार, उद्यान एक्स्प्रेसमधल्या लेडीज डब्यातील हा प्रकार घडला आहे. काल रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. दादर स्टेशनच्या प्लॅटफॅार्मवर उद्यान एक्स्प्रेस ट्रेन काल रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास आली. एक्स्प्रेस ट्रेन आल्यानंतर जनरल लेडीज डब्यातील सर्व महिला उतरल्या. मात्र, पीडित तरूणी एकटीच डब्यात होती. या एकट्या तरुणीला पाहून हल्लेखोर डब्यात चढला. यावेळी तरूणीने त्याला प्रतिकार केला. झटापटीत हल्लेखोराने धावत्या ट्रेनमधून फेकून दिले. सुदैवाने ती प्लॅटफॅार्मवर पडली आणि जखमी होवून बेशुद्ध पडली.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी दारुच्या नशेत कृत करणाऱ्या हल्लेखोराला सीएसटी रेल्वे स्टेशनवरून अटक केली आहे. तसेच पोलिसांनी या हल्लेखोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

महत्त्वाच्या घडामोडी –

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीला अपघात

भाजप घरी चहा प्यायला आला तर त्यांच्यासाठी दरवाजे उघडे आहेत, पण…; प्रकाश आंबेडकर यांचं मोठं वक्तव्य

महाराष्ट्रात औरंग्याची औलाद खपवून घेतली जाणार नाही; माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा इशारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here