दादर, माहीमच काय नितेश राणेंना कोकणातही जिंकू देणार नाही; शिवसेनेचा इशारा

0
2095

मुंबई : गेल्या महिन्यात भाजपाचे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते माहीममध्ये भाजपाच्या कार्यालयाचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबईच्या ‘प्रॉपर्टी कार्ड’वर शिवसेनेचे नाव लिहिलेले नाही. मुंबई आमचीही आहे. मुंबईच्या सर्व वॉर्डात भाजपाची ताकद वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे, असं नितेश राणे म्हणाले होते. त्यावरुन शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी नितेश राणेंवर निशाणा साधलाय.

भाजपाला दादर, माहीममध्ये प्रवेश मिळणार नाही. भाजपा आणि नितेश राणे यांनी अशी अनेक दुकाने उघडली आहे. त्यांना कितीही दुकाने उघडू द्या. नितेश राणेंना आम्ही त्यांच्या कोकणातल्या मतदार संघातही जिंकू देणार नाही, असं सदा सरवणकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, सदा सरवणकर आणि मुंबई महानगरपालिका सभागृह नेत्या विशाखा राऊत यांच्या हस्ते माहीम इथे ‘शिव भोजन केंद्रा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात सदा सरवणकर बोलत होते.

महत्वाच्या घडामोडी –

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

“माझा राजकीय प्रवास संपविण्याचा प्रयत्न; महिलेच्या आरोपांवर संजय राठोड यांचं स्पष्टीकरण”

‘या’ निवडणुकीसाठी शिवसेना – भाजपची पुन्हा एकदा युती

“भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलील चंद्रकांत खैरेंपेक्षाही चांगले नेते”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here