भर रस्त्यात शिवसैनिकांची पिस्तुल दाखवून दादागिरी?; इम्तियाज जलीलांनी व्हिडिओ केला ट्विट

0
323

मुंबई : शिवसेनेचा लोगो असलेल्या वाहनातून प्रवास करत असलेले 2 जण बंदुकीचा धाक दाखवत असल्याचा व्हिडीओ एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी ट्विट केला आहे.

या व्हिडिओमध्ये रस्त्यावर वाहतूक कोंडी दिसत आहे. यात एक कार दिसत आहे. त्या कारच्या मागच्या बाजूस शिवसेनेचा लोगो आहे. या कारमधील चालक आणि त्याच्या मागील सीटवरील व्यक्तीच्या हातात बंदूक आहे. दोघांचेही हात कारच्या बाहेर आहेत. त्या बंदुका इतर वाहनांमधील व्यक्तींना दाखवत दोघे जण कोंडीतून वाट काढत गाडी पुढे नेताना दिसत आहे.

हे महाराष्ट्रातील पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर आहे ! वाहनवरील लोगो हे सर्व सांगते ! शुक्रवारी रात्री शिवसैनिक त्यांच्या गाडीसाठी मार्गक्रमण करीत असताना रिव्हॉल्व्हर्सचे ब्रँडिंग करीत होते. गृहमंत्री /पोलीस महानिरीक्षक या अधर्मची दखल घेऊ शकतात का!, असं ट्विट इम्तियाज जलीलांनी केलं आहे.

महत्वाच्या घडामोडी-

राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यामुळे हिंदुत्वाच्या भूमिकेला बळकटी मिळेल- प्रवीण दरेकर

अखेर अण्णा हजारेंचा हट्ट मागे! देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर अण्णांनी उपोषण मागे घेतलं

“संत आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा अपमान करणं, ही काँग्रेसची जुनी परंपरा आहे”

लोकल ट्रेनचा फायदा नक्की कोणाला? सर्वसामान्य जनतेला की…; राम कदमांची टीका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here